इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक प्रकट मुलाखत चांगलीच चर्चेची ठरली आहे. अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा विषयांवर राज ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं भारताबाहेर आहेत, तिथे त्यांनी त्यांचं एक जग उभं केलं, ते तिथे यशस्वी झालेत, या सगळ्या प्रवासात त्यांनी जो अनुभव गोळा केला असेल, जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्या त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल , तर त्या त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत.
बाकी आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे २ मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि ‘मराठी’ म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत हे राज ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं.
मुलाखतीची लिंक बघा…