नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी नवापूर येथील मंडळ कृषी अधिकारी सागर अहिरे यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांच्या विरुध्द नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर थुवा तालुका नवापूर येथील शेत सर्वे नंबर ९५/१/अ या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती. सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी आरोपी सागर अहिरे, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नवापूर यांनी पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचे कडून २० फेब्रुवारी रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांच्या विरुद्ध नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*लाच मागणी सापळा कारवाई
*युनिट -* नंदुरबार
तक्रारदार- पुरूष वय-३७
आलोसे- सागर अशोक अहिरे, वय ३३ वर्षे, मंडळ कृषी अधिकारी , ( वर्ग 2 ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नवापूर, जिल्हा- नंदुरबार. रा. प्लॉट नं १०, रूपाइ नगर, पेरेजपूर रोड, साक्री ता.साक्री जि. धुळे.
*लाचेची मागणी- २५,०००/-
*तडजोडीअंती मागणी केलेली रक्कम- २०,०००/-
*तक्रार:-तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर थुवा तालुका नवापूर येथील शेत सर्वे नंबर ९५/१/अ या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती. सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी आरोपी लोकसेवक सागर अहिरे, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नवापूर यांनी पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचे कडून दिनांक २०/०२/२०२४ रोजी २५,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने यातील आलोसे यांचे विरुद्ध नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी –
श्री. समाधान वाघ, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार मोबा.नं.888880510.
पर्यवेक्षण अधिकारी :-
श्री राकेश चौधरी*
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.,नंदुरबार
मो.न. 9823319220
पडताळणी कार्यवाही पथक :-
पोहवा/ विजय ठाकरे,
पोहवा/ विलास पाटील,
पोना/ देवराम गावित,
पोना/ हेमंत कुमार महाले,
पोना/ सुभाष पावरा, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार