इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्ह्यातील परळी येथे झालेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचे समर्थक व मरळवाडीचे विद्यमान सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते हे जखमी झाले आहेत. या गोळीबारामागील कारण मात्र अद्याप पुढे आले नाही.
शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा ही घटना घडली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या दोघांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.