इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-20 विश्वविजेपद मिळवले. अतिशय़ रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत हा विजय मिळवला. वर्ल्ड कपमधील भारतीय संघाने टॅास जिंकत आज पहिले फलंदाजी केली. तर साऊथ आफि्केने गोलांदाजी केली. या अंतिम सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेला ७ विकेट गमावत १७७ धावांचे आव्हान दिले होते. साऊथ आफ्रिकेने ८ विकेट गमावत १६९ धावा केल्या. हा सामना जिंकल्यानंतर देशभर उत्साहाचे वातावरण आहे.
या सामन्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिहं यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले. अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी हा सामना फिरवला. २४ चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला २६ धावांची गरज होती. त्यावेळी हर्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप यांनी भेदक मारा केला. त्याला जोड सूर्यकुमार यादवच्या फिल्डींगची मिळाली. सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेविड मिलन याचा झेल घेतला.
गोलंदाजींनी केली ही कामगिरी
या सामन्यात अर्शदीप सिंह याने ४ षटकात २० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराहने आपल्या षटकात फक्त १८ धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने ३ षटकात २० धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. अक्षर पटेल याला एक विकेट मिळाली.
अशी होती भारतीय फलंदाजी
आज भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिलेच तीन विकेट झटपट गेल्यामुळे भारतीय संघात चिंता होती. रोहित शर्मा ९, ऋषभ पंत ०, सूर्यकुमार यादव ३ धावांवर आऊट झाल्याने भारतीय संघाची स्थिती ३ बाद ३४ अशी झाली होती. मात्र त्यानंतर विराट आणि अक्षर पटेल या दोघांनी टीम इंडियाचा डावा सावरला. या सामन्यात अक्षर पटेल याने धुव्वाधार ४७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ७६, शिवम दुबे २७, हार्दिक पांडया ५ ,रवींद्र जडेजा २ धावा केल्या
पावसाने घेतली विश्रांती
सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन या मैदानावर रंगला असून संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरूवात झाली. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे बोलले जात होते. पण, पावसाने आज विश्रांती घेतल्यामुळे प्रेक्षाकांना हिरमोड झाला नाही.
हा होता भारतीय संघ
या अंतिम सामन्यात भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हे खेळाडू मैदानात होते.