इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टी-20 वर्ल्ड कपमधील भारतीय संघाने टॅास जिंकत आज पहिले फलंदाजी केली. तर साऊथ आफि्केने गोलांदाजी केली. या अंतिम सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेला ७ विकेट गमावत १७७ धावांचे आव्हान दिले आहे. आज भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिलेच तीन विकेट झटपट गेल्यामुळे भारतीय संघात चिंता होती. रोहित शर्मा ९, ऋषभ पंत ०, सूर्यकुमार यादव ३ धावांवर आऊट झाल्याने भारतीय संघाची स्थिती ३ बाद ३४ अशी झाली होती. मात्र त्यानंतर विराट आणि अक्षर पटेल या दोघांनी टीम इंडियाचा डावा सावरला. या सामन्यात अक्षर पटेल याने धुव्वाधार ४७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ७६, शिवम दुबे २७, हार्दिक पांडया ५ ,रवींद्र जडेजा २ धावा केल्या
हा सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन या मैदानावर रंगला असून संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरूवात झाली. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे बोलले जात होते. पण, पासवाने आज विश्रांती घेतल्यामुळे प्रेक्षाकांना हिरमोड झाला नाही.
या अंतिम सामन्यात भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हे खेळाडू आज मैदानात होते.
भारतीय फलंदाली झाल्यानंतर हा सामना भारतीय संघ सहज मारेल असा सर्वांना विश्वास आहे. आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी सरस झाली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळेल असे सर्वांना वाटत असले तरी दुसरीकडे साऊथ आफ्रिकेला पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे ते यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.