इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील कार्यालयावर महापालिकेच्या अनधिकृत विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. गीते यांच्या संपर्क कार्यालयावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक पोलिसांसह दाखल झाले. त्यानंतर कार्यालयातील महापुरुषांचे फोटो काढण्यात आले आहेत. या कारवाईच्या वेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या कारवाईवर बोलतांना वसंत गीते यांनी सांगितले की. ही जागा एसटी महामंडळाची आहे. येथे महापालिकेचा काहीही सबंध नाही. ही केलेली कृती बेकायदेशीर आहे. सर्व राजकीय सुडपोटी चाललेल्या कारवाई आहेत. महापालिकेने ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता १ वर्ष पूर्वी मोजली आहे. ३५ वर्षापासून माझे कार्यालय येथे आहे. आम्ही कोर्टात या कारवाईला आव्हान देऊ..