इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अहमदनगर येथील दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ही खंडणी मागण्यात आली होती.
या आरोपींनी धोंडे यांची अश्लील व्हिडिओ क्लिप ‘सोशल मीडिया’वर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यात बदनामी करून राजकीय कारकीर्द संपून टाकू, असेही तिघांनी सांगितले होते. हा गुन्हा जानेवारी ते २६ जून दरम्यान हॉटेल रॉयलमध्ये घडला. या प्रकरणी अहमदनगरमधील दोन महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक कोटी रुपयांच्या खंडणीतील २५ हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून भैया बॉक्सरने स्वीकारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.