इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लडाखः लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याच्या सरावाच्या वेळी टी-७२ टँक नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढून रणगाडा बुडाल्याने जेसीओसह पाच जवानांना हौतात्म्य आले. ही घटना रात्री एक वाजता घडली. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, चुशुलपासून १४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ ही घटना घडली. आरआयएस एमआर के. रेड्डी, डीएफआर भूपेंद्र नेगी, एलडी अकदुम तयबम, हवालदार ए खान (६२५५ एफडी वर्कशॉप), सीएफएन नागराज पी (एलआरडब्ल्यू) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. सहसा या रणगाड्यांत कमांडर, तोफखाना आणि ड्रायव्हर असतो; मात्र आज सराव सुरू असताना त्यात पाच सैनिक होते.