नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामिण पोलीसांनी संपूर्ण जिल्ह्यात गुरूवारी मिशन हातभट्टी ऑल आऊट मोहिम राबवून ६० जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत हातभट्या उध्वस्त करीत पोलीसांनी सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात ५९ हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामिण भागातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटनासाठी अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये व अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर व मालेगावचे प्पर अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. नाशिक ग्रामिण आणि मालेगाव अस्थापनाच्या अंतर्गत येणा-या सर्वच पोलीस ठाणेनिहाय त्या बाबत नियजन करण्यात येवून नदी नाल्यांसह डोंगरद-या पायदळी तुडवत पथकांनी हातभट्या उध्वस्त केल्या.
याबरोबरच बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी छापेमारी करीत पोलीसांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ५९ केसेसे दाखल केल्या. दिवसभराच्या कारवाईत ६० जणांच्या मुसक्या आवळत ग्रामिण पोलीसांनी तब्बल ३ लाख १३ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नागरीकांनी अवैध धंद्याबाबत माहिती असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
……