इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला.
राज्यातील महिलां व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येत्या एक जुलै 2024पासून लागू करण्यात येत असून 21ते 60 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा रु 1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, या योजनेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न!
मुख्यमंत्री लाडकी बहीण ही लाभार्थी महिलांची पात्रता-
महिला राज्याची रहिवाशी असावी, ती विवाहित, विधवा,घटस्फोटीत, परित्यकता, निराधार असावी. स्वतःचे बँक खाते असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा ज्यास्त नसावे.
अपात्रता
कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. कुटुंबातील सदस्य नियमित /कायम कर्मचारी /कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /उपक्रम /मंडळ /भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्त नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. लाभार्थी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु 1500/-पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे. जाच्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्त पणे पाच एकर पेक्षा ज्यात शेतजमीन आहे, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन( ट्रॅक्टर वागळून)कुटुंबातील सदश्यांचे नोंदणीकृत आहेत.
लागणारी कागद पत्र ऑनलाईन अर्ज करावा
आधारकार्ड, रहिवासी दाखला/जन्म दाखला. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50/-पर्यंतच असणे अनिवार्य आहे)बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो,रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याचे प्रतिज्ञापत्र.
लाभार्थी निवड ,लाभार्थीची पात्रता
अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षिका /मुख्य सेविका /सेतूसुविधाकेंद्र /ग्रामपंचायत /ग्रामसेवक /वार्ड अधिकारी व सक्षम यांच्या जबादाऱ्या निश्चित केल्या आहेत.
योजना काल मर्यादा
अर्ज दि. 15जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन दाखल करावा,लाभार्थीना दि. 14आगस्ट 2024पर्यंत बँकेत जमा होईल, प्रत्येक महिन्याच्या 15तारखेला रक्कम मिळेल.
या योजनेतून दरमहा महिलांना १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने परिपत्रक काढले असून त्यात योजनेविषयी सर्व माहिती दिली आहे.