इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
NEET परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने झारखंडमधील हजारीबागच्या ओएसीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एहसान उल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज आलम यांना अटक केली आहे. डॉ एहसान उल हक ही नीट परीक्षेचा को- ऑर्डिनेटर होता. या प्रकरणात स्थानिक वृत्तपत्रातील एका पत्रकाराचीही चौकशी सुरु असून त्यालाही अटक करण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात ५ मे रोजी नीटसाठी वेगवेगळ्या शहरात प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेमध्ये घोळ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर २६ जून रोजी सीबीआयने हजारीबाग येथील ओएससीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एहसान उल हक चौकशी केली होती. आता अटक केली आहे.