इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने 14 मार्च 2024 रोजी दूरसंचार मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा) नियमन, 2024 जारी केले, जे 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
या सुधारणा नियमांचे उद्दिष्ट अप्रामाणिक तत्वांद्वारे फसव्या सिम स्वॅप/रिप्लेसमेंटच्या मार्गाने मोबाईल क्रमांक पोर्टिंगला आळा घालण्यासाठी आहे. या सुधारणा नियमांद्वारे, युनिक पोर्टिंग कोड (युपीसी) च्या वाटपाची विनंती नाकारण्यासाठी अतिरिक्त निकष लागू करण्यात आला आहे. विशेषत:, यूपीसीसाठी विनंती सिम स्वॅप/रिप्लेसमेंटच्या तारखेपासून सात दिवस संपण्यापूर्वी केली असल्यास, यूपीसीचे वाटप केले जाणार नाही.
कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी, ट्राय चे सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-20907758 वर संपर्क साधला जाऊ शकतो.