इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात एकूण खर्च ६.००२ लाख कोटी होता. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने केलेल्या लोकप्रिय घोषणा बघता सरकारचा खर्च किमान १ लाख कोटींनी वाढणं अपेक्षित होतं, परंतु आज अर्थमंत्र्यांनी एकूण खर्च केवळ ६.१२ लाख कोटी दाखवला… योजनांचा खर्च वाढूनही एकूण खर्चात मात्र कोणतीही वाढ न होणं, याचा अर्थ कुछतोगोलमाल_है अशी शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
हा अर्थसंकल्प भाजपबरोबर गेलेल्या काका अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून मांडला आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात असलेल्या पुतण्या आमदार रोहित पवार यांनी याबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेची भाकरी भाजण्यासाठी लागणारं मतांचं पिक काढण्यासाठी केलेली ही लोकप्रिय योजनांच्या घोषणांची पेरणी’, आहे. परंतु या सर्व घोषणा हवेतल्या असल्याने यापूर्वीच्या घोषणा जशा हवेत विरल्या तसंच या घोषणांचंही होणार आणि सामान्य माणसाच्या हाती मात्र काहीही पडणार नाही! सदनात बजेटवर होणाऱ्या चर्चेच्या वेळी या विषयावर सविस्तर बोलेल!