नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील मल्हारखान भागात चॉपरचा घेऊन फिरणा-या तरूणावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून धारदार चॉपर हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या कारवाईत औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात चॉपर घेऊन फिरणा-या तरूणावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून धारदार चॉपर हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत साहिल मोहम्मंद शेख ( रा.प्रबुध्दनगर,सातपुर ) असे संशयीत चॉपरधारीचे नाव आहे. गंगापूररोडवरील मल्हारखान भागात उभ्या असलेल्या शेखकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१९) पोलिसांनी धाव घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चॉपर मिळून आला. याबाबत पोलिस शिपाई रविंद्र लिलके यांनी दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक थेटे करीत आहेत.
दुस-या कारवाईत रोशन दिलीप जाधव (२२ रा. भाग्यलक्ष्मी बिल्डींग ध्रुवनगर) असे संशयीत चॉपरधारीचे नाव आहे. शिवाजीनगर भागातील तुळजा भवानी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या जाधवकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२४) पोलिसांनी धाव घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चॉपर मिळून आला. याबाबत पोलिस शिपाई मच्छीद्रनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.