इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी जुलै महिन्यात निवडणुक होणार आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी १० नावाचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक आता या नावात कोणावर शिक्कामोर्तब होतो. हे महत्त्वाचे आहे.
महायुतीकडे २०१ आमदाराचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे ६७ आमदाराची संख्या आहे. ६ आमदार तटस्थ आहे. या निवडणुकीत महायुतीला ९ तर महाविकास आघाडीला २ आमदार सहज निवडून आणता येणार आहे. त्यामुळे महायुतीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला किती जागा मिळतात यावरही बरंच काही अवलंबून आहे.