गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पोहोच केली बैलजोडी…हे आहे कारण

by Gautam Sancheti
जून 28, 2024 | 1:24 pm
in राज्य
0
Dhananjay Munde 2 1140x570 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैल जोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैल जोडी भेट पाठवली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात विविध प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त प्रदर्शित केले होते.

वृत्ताची दखल घेत मंत्री श्री. मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज श्री. मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले. पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती.

दरम्यान मंत्री श्री. मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला, यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैल जोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टर साठी देखील अर्ज करावा, असे बालाजी पुंडगे यांना म्हटले. तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू; असा शब्द धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी बी.डी.बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर…

Next Post

विधान परिषदेसाठी भाजपने केंद्राला पाठवली ही १० नावाची यादी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
bjp11

विधान परिषदेसाठी भाजपने केंद्राला पाठवली ही १० नावाची यादी…

ताज्या बातम्या

IMG 20250731 WA0002

पुरोहित संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची घेतली भेट…कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा

जुलै 31, 2025
cbi

घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर सीबीआयची मोठी कारवाई…४७ ठिकाणी छापे

जुलै 31, 2025
Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011