इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झारखंड उच्च न्यायालयाने जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे. अंचल जमीन घोटाळ्याशी संबधित मनी लॅाड्रिंग प्रकरणात हा दिलासा दिला आहे.
हेमंत सोरेन यांच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्यासमोर तीन दिवस सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने १३ जून रोजी आपला निर्णय़ राखून ठेवला होता. न्यायालयाने आज याबाबत आपला फैसला देत सोरेन यांना जामीन मंजूर केला.