इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. महायुती सरकारचे हे अंतरिम बजेट असून ते या पंचवार्षिकमधील शेवटचे आहे. या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बजेटमधून कोणत्या घोषणा जाहीर केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठ्या घोषणा करणार आहे.
कालच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४’ चा अहवाल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. या पाहणीच्या दुस-या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ही ७.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे १३,९ टक्के इतका आहे.
या ठिकाणी बघा विधीमंडळाचे कामकाज….