मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळण्याची घोषणा आज अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असणार आहे. याबाबत अगोरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली होती. त्याची अमंलबजावणी आता होणार असल्याचे बोलले जात आहे.
परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफी विषयी चर्चा सुरु झाली. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या ६४२ आणि नव्याने सुरु होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही.