इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई- राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणा तिढा सोडवण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने मुंबईत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यातील ओबीसी नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.
२९ जूनच्या बैठकीत ओबीसी नेते काय बोलणार आणि त्यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथील उपोषणाच्यावेळी ओबीसी प्रवर्गातून इतर कोणालाही आरक्षण देणार नाही, याची लेखी हमी सरकारे द्यावी, अशी मागणी केली होती. ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसंदर्भातही या वेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, असा पण केला असून जरांगे पाटील राज्य सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.