इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरीं यांनी अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला. विधानसभेची सत्ता नको पण, अजित दादांना काढा अशी टोकाची मागणी केल्यामुळे महायुतीमधील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी हा मागणीवरुन अजितदादांना कोंडीत पकडले आहे.
शिरुर लोकसभेची आढावा बैठक पुण्यात पार झाली. या बैठकीत भाजपचे आमदार राहुल कुलही होते. राहुल कुल यांच्यासमोरच सूदर्शन चौधरींनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी सूदर्शन चौधरींची अजित पवारांवर बोलण्याची लायकी नाही असे सांगितले.
त्यानंतर अजितदादांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. सुदर्शन चौधरींच्या कार्यालयावर धडक देत घोषणाबाजीही केली आणि कार्यालयात ठिय्याही दिला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. दादांच्या कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर सूदर्शन चौधरींनी आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे म्हटले. पण, हा वाद काही शमायला तयार नसल्यामुळे महायुतीमधील चिंता वाढली आहे.
याअगोदरही अजितदादा आल्यामुळे लोकसभेत महायुतीचा पराभव झाल्याचे वक्तव्य भाजप व शिंदे गटाकडून आले होते. त्यानंतर आता पुण्यातच हा वाद रंगल्यामुळे अजितदादांची अडचण झाली आहे.