मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील महत्तवाचे रेल्वे स्थानक असलेल्यामनमाड रेल्वे स्थानकावर भुसावळ येथून खास रेल्वे वॅगनने पाणी आणण्यात आले. दोन वॅगनद्वारे प्रायोगिक तत्वावर हे पाणी आणण्यात आले आहे. मनमाडची पाणी टंचाई सर्वश्रुत आहे. भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास मनमाड रेल्वे स्थानकावर त्याचा झळा बसू नये, प्रवाशांना पाणीटंचाई जाणवू नये यासाठी करता येईल याची प्रायोगिक चाचणी करण्यात आली. त्यासाठी विशेष जलवाहिनी करण्यात आलीय. दरम्यान या चाचणीबाबत रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.