इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकाच लिफ्टमधून आलो. अनेकांना वाटले असेल, ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे! ती अनौपचारिक भेट होती. काही चर्चा नाही. भिंतीला कान असतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करु असे सांगत उध्दव ठाकरे यांनी भेटीबाबत सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, महायुती सरकार हे महागळती सरकार आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती होत आहे. पेपरफुटी होत आहे. या सरकारला लाज लज्जा, शरम नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
ठाकरे म्हणाले, की उद्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असेल. निधी खर्च होणार नाही. घोषणा खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली, याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. हे खोके सरकार आहे. राज्यातील शेतकरी कोणत्या परिस्थितीत आहे, ते काय त्रास भोगत आहेत, हे राज्याला कळले आहे. निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसात राम मंदिरात झालेल्या वगळतीवरून आणि देशभरातील पेपर फुटीवरून ठाकरे यांनी मोदी सरकावरला लक्ष्य केले.
ठाकरे म्हणाले, की चंद्रकांतदादांनी मला चॉकलेट दिले. आता लोकांना आश्वासनाचे चॉकलेट देऊ नका. जनता शहाणी आहे. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यांची अंमलबजावणी देऊ नका. त्यांचे चंद्रपुरातील भाषण हिणकस होते. माझ्या काळात कोरोना होता. पेपरफुटीची चर्चा झाली, तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटे नरेटिव्ह यालाच म्हणतात.