नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दूरसंवाद सेवा प्रदात्यांच्या नवीन स्पेक्ट्रम गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सेवांचे सातत्य आणि वाढ याची खातरजमा करण्यासाठी 2024 मध्ये कालबाह्य होणारे स्पेक्ट्रम आणि 2022 मध्ये झालेल्या मागील स्पेक्ट्रम लिलावाचे न विकलेले स्पेक्ट्रम या वर्षी लिलावासाठी ठेवण्यात आले होते.
800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 2500 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ, आणि 26 गिगाहर्टझ बँडमधील सर्व उपलब्ध स्पेक्ट्रम लिलावासाठी ठेवण्यात आले होते. या वर्षीच्या लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ आणि 2500 मेगाहर्ट्झ बँडमध्ये लिलाव दिसून आला.
लिलाव 25 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाला आणि 7 फेऱ्यांनंतर 26 जून 2024 रोजी सकाळी 11:45 वाजता संपला. 5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव नुकताच झाला आणि 5G मुद्रीकरण अद्याप प्रगतीपथावर आहे, 800 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्टझ बँडमधील स्पेक्ट्रमकरिता कोणतीही बोली लागली नाही. ऑगस्ट 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पेक्ट्रम म्हणजेच 51.2 Ghz स्पेक्ट्रम विकले गेले हे वास्तव असले तरी शिल्लक 533.6 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रममधून एकूण 141.4 मेगाहर्टझ (26.5%) ची विक्री झाली.
मेसर्स भारती एअरटेल लिमिटेड, मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि मेसर्स व्होडाफोन आयडिया लिमिटेड या तीनही टीएसपींनी या लिलावामध्ये सेवांची वाढ आणि सातत्य यासाठी यशस्वीपणे बोली लावली आणि स्पेक्ट्रम घेतले. 11,340 कोटी रुपयांच्या एकूण 141.4 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची विक्री झाली.