मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पावसाळी अधिवेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये प्रवास केला. राज्यात राजकारणातले हे पॅाझिटिव्ह चित्र सर्वांनाच बघायला मिळाले. विधीमंडळाच्या लिफ्टजवळ दोन्ही नेते एकत्र दिसल्यामुळे त्याची राजकीय चर्चाही रंगली.
या लिफ्टमध्ये नेमकं काय संवाद झाला यावर प्रवीण दरेकर म्हणाले, राजकारणात आपण, राजकीय शत्रू असू, पण, सदारसर्वकाळ शत्रू नसतो, लिफ्टमध्ये शिरत असतांना देवेंद फडणवीस व उध्दव ठाकरे हे दोघेही नेते आले. मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होतो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, आपण दोघं एकत्र आहोत, बरं वाटतं, त्यावर उध्दव ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, याला पहिले बाहरे काढा, तेव्हा मी बोललो की, तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन, माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र, बोलता तसं करा, त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. त्यानंतर उध्दव ठाकरे विरोधी दिशेला व आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. त्यानंतरचे हे चित्र सर्वांनाच धक्का देणारे होते. यावेळी लिफ्टमध्ये या दोन्ही नेत्यांबरोबर मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर होते. लिफ्टमधून उतरल्यानंतर दोन्ही नेते वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. त्याअगोदर मंत्री चंद्रकांत पाटील यांची उध्दव ठाकरे बरोबर भेट झाली.