इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अनंत चतुर्दशीला राज्यभरात लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र या उत्साहाला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गालबोट लागले. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दुर्घटना सुमारे १२ ते १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ७ जण तर रत्नागिरी, वाशीम आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा, मुंबई व जळगाव प्रत्येकी १ समावेश आहे. या दुर्घटनांमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. यापैकी काही जणांचा बुडून मृत्यू झाला तर काही जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर ध्वनीवर्धकामुळे देखील गणेश विसर्जनाच्या निर्मिती त दोन दिवसांपूर्वी आधीच दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली.
अशा घडल्या दुर्दैवी घटना
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरला. दरम्यान या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. तर मुंबईत जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस कोसळत होता. यावेळी एका १६ वर्षीय स्वंयसेवकचा मृत्यू झाला. नाशिक येथे गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
११ जणांवर गुन्हा दाखल
गणेश विसर्जन मिरवणूक म्हटले की डीजे आणि डॉल्बी यांचा ठरलेला असतो, काही वेळा त्यावर बंदी घालण्याची मागणी देखील होत असते. परंतु अद्यापही डीजेच्या आवाजाने त्रास होत असताना त्यावर बंदी मात्र येत नाहीत. त्यामुळे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्याचे दिसून येते. सांगली जिल्ह्यात अशाच प्रकारे दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमधील ध्वनीवर्धकांच्या तीव्र क्षमतेने जिल्ह्यात सोमवारी रात्री दोन तरूणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कवठेएकंद आणि दुधारी येथे विसर्जन मिरवणुकीचा सोहळा सुरू होता. या ध्वनीवर्धकांच्या तीव्र आवाजात तरूणाईचा जल्लोष सुरू होता. या मिरवणुकीमध्ये हे दोन तरूण सहभागी झाले होते. दुधारीतील मिरवणुकप्रकरणी ११ जणांविरुध्द विनापरवाना ध्वनीवर्धकाचा वापर करुन सार्वजनिक शांतताभंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर ७६ मंडळावर ध्वनीमर्याद भंग प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. सोमवारी गणेश उत्सवात सातव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शेखर पावसे (वय ३२) आणि दुधारी (ता.वाळवा) येथे प्रवीण शिरतोडे (वय ३५) या दोन तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.