राहुल सोनवणे, रेल्वे अभ्यासक
दररोज हजारो नाशिककर मुंबईला कामा निमित्ताने जात येत असतात. यातील २० टक्के लोक नाशिकरोडहून पंचवटी, राज्य राणी, वंदे भारत सारख्या गाड्यांचा पर्याय घेतात. उरलेले ८० टक्के लोक कसारापर्यंत रस्त्याने १.१५ ते १.३० तासात एसटीबस किंवा खासगी काळी पिवळी टॅक्सीने जातात. सकाळी ६ पासून रात्री १० पर्यंत एकूण १६ लोकल ट्रेन मुंबई CSMT साठी जातात आणि तेवढ्याच परतायला. सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या कुठल्याही उपनगरांत किफायतशीर जाण्याचा हा पर्याय लोकप्रिय आहे.
आज ही फक्तं १५० रुपयात मुंबईच्या कुठल्याही उपनगरांत जाता येते. कसारा मुंबई लोकल सर्विस सुरु होऊन आज जवळपास ३५-४० वर्षे झाली. परंतु, कसारा गाव आहे तसेच बकाल राहिले. उलटे स्टेशनच्या परिसरात अतिक्रमण वाढल्याने या परिसरात ST बस, टॅक्सी जायला अवघड झाले आहे. या वर काही दररोज मुंबई ला अप डाऊन करणार्यांनी उंबरमाळी, मुंबई आग्रा हायवेला लागून असलेल्या स्टेशनचा पर्याय, शोधला. या ठिकाणी पार्किंगचा पर्याय उपलब्ध असल्याने काही जण नाशिक हून आपले स्वतःचे वाहन या ठिकाणी पार्क करतात.
एस. टी महामंडळाने पण काही लोकलच्या कनेक्शन साठी बसेस सोडल्या आहेत. कसाराला पर्याय म्हणुन नाशिककरांसाठी उंबरमाळी स्टेशन चांगला होऊ शकतो. हायवेला लागून आणि पार्किंगसाठी उपलब्ध जागा.
https://maps.app.goo.gl/bgmhMkcLcURg1ecz9