नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४० गुंठे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी ३५ हजार रुपयाची लाच घेणा-या प्रभारी भूकरमापक सचिन काठे हे एसीबीच्या जाळयात अडकले. नाशिक येथील मुंबईनाका पोलीस स्टेशन, येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार यांचे “मौजे अंजनेरी ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक येथील सर्व्हे नं. १९९/ब मधील ४० गुंठे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी भूकरमापक सचिन काठे यांनी पंचा समक्ष सुरुवातीला ४० हजार रुपये त्यानंतर तडजोडअंती ३५ हजार रुपये पंच व साक्षीदारा समक्ष स्विकारली. त्यांच्या विरुध्द मुंबईनाका पोलीस स्टेशन,येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, वय- ४९ वर्ष.
आलोसे- श्री. सचिन भाऊसाहेब काठे वय ३७ वर्षे
पद- प्रभारी भूकरमापक
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, त्र्यंबकेश्वर वर्ग -३ रा. रिव्हीर राईन नेस्ट , फ्लॅट नं. 203 , दसक, जेलरोड, नाशिकरोड
*लाचेची मागणी- ४०,००० /- तडजोडअंती ३५,०००/- रुपये
*लाच स्विकारली- ३५,०००/-
*हस्तगत रक्कम- ३५,०००/-
*लालेची मागणी – दि.२५/०६/२०२४
*लाच स्विकारली – दि.२६/०६/२०२४
तक्रार:– यातील तक्रारदार यांचे “मौजे अंजनेरी ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक येथील सर्व्हे नं. १९९/ब मधील ४० गुंठे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी आलोसे यांनी पंचा समक्ष सुरुवातीला ४०,०००/- रुपये त्यानंतर तडजोडअंती ३५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, सदरची ३५,०००/- रुपये लाचेची रक्कम दिनांक २६/०६/२०२४ रोजी पंच साक्षीदारा समक्ष स्विकारले म्हणून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. उप संचालक, भूमी अभिलेख, नाशिक
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी – श्री. स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 9403234142
*सापळा पथक – पोहवा/प्रभाकर गवळी, पोना/ संदिप हांडगे,पोना/किरण धुळे , पोना/ सुरेश चव्हाण ,पोहवा/ संतोष गांगुर्डे