नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रिक्षातून उतरत असतांना तोल जावून पडल्याने ५२ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरेंद्र पंडीत वरखेडे (रा.तुळजा भवानी रो हाऊस,इच्छामणीनगर,पाथर्डी फाटा) असे मृत रिक्षा प्रवाशीचे नाव आहे. वरखेडे १९ मे रोजी नाशिकरोड भागात गेले होते. विहीतगाव पुलाजवळ ते अॅटोरिक्षातून उतरत असतांना तोल जावून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने भाऊ किशोर वरखेडे यांनी त्यास बिटको रूग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी (दि.२५) अधिक उपचारार्थ त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले असता डॉ. आदित्या कोंडापल्ली यांनी तपासून मृत घोषीत केले.