नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात घरात घुसून एकाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. जीवे ठार मारण्याची धमकी देत एकाने हे कृत्य केले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज केशवराव भोसले (रा.गंगापूररोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पारिजात नगर भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयितामध्ये २०१८ पासून प्रेमसंबध होते. विविध प्रलोभने दाखवत संशयिताने कायम सोबत राहण्याची हमी दिल्याने त्याचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.
२०२३ मध्ये त्याचे अन्य महिलेसमवेत अनैतिक संबध असल्याच्या कारणातून वाद सुरू होता. गेल्या सोमवारी (दि.१७) संशयिताने महिलेचे घर गाठून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.