नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाच्या इतिहासात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात भाजप आघाडीने ओमप्रकाश बिर्ला यांनी ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे काँग्रेसचे खासदार के सुरेश यांचा पराभव झाला. आवाजी मतदानाने ही निवडणुक झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी व विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी आसन पर्यंत स्पीकरला घेऊन गेले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला १३ पक्षांनी समर्थन दिले. लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
लोकसभेत ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ५४२ खासदार आहेत. त्यात २९३ खासदार असलेल्या NDA कडे स्पष्ट बहुमत आहे. INDIA आघाडीकडे २३६ खासदारांच संख्याबळ आहे. अपक्षासह अन्य एकूण १३ खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी २७१ मतांची आवश्यकता होती. ती पूर्ण करत ओम बिर्ला निवडणूक जिंकले.