नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सोमवारी (दि.२४) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यात २६ वर्षीय तरूणासह ४० वर्षीय इसमाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शाहिद सहजिद अन्सारी (२६ रा.पितृछाया बंगला,गोपाळनगर) या तरूणाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुर्बान अन्सारी यांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
दुसरी घटना कोणार्क नगर भागात घडली. संजय दत्तू बोराडे (४३ रा.लक्ष्मीदीप सोसा.चंपानगरी,कॅनलरोड जेलरोड) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आडगाव शिवारातील कोणार्क नगर भागात सुरू असलेल्या सिंधू संकल्प या बांधकाम साईटवरील एका सदनिकेच्या बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत बाळू गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.