नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी 26 जून, 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायं. 6.00 पर्यंत मतदान होणार आहे. खासगी आस्थापनेवरील काम करणा-या शिक्षक मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कळविले आहे.
शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या शासकीय शिक्षकांना विशेष नैमित्तीक रजा जाहीर केलेली आहे. परंतु निवडणुकीकरिता मतदार असणा-या खासगी आस्थापनामध्ये काम करणा-या मतदारांना सदर विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. याकरिता खासगी आस्थापनेवरील काम करणा-या शिक्षक मतदारांना मतदान करण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत कळविण्यात आले आहे. तरी खासगी संस्था चालकांनी संस्थेतील शिक्षक मतदारसंघाच्या मतदारांना मतदान नोंदविण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी.