येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड पाठोपाठ येवल्यातही पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना येवल्यात शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यात आले.
निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयांचे पॉकेट देताना पकडून पकडले आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. पैसे वाटप करणाऱ्यांनी विवेक कोल्हे यांचेचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांसमोर कबूल केल्याचे सांगितले जाते.