मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपी असलेल्या मुलाच्या आत्या पूजा जैन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता.
या प्रकरणात अगोदर युक्तीवाद झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. आज या प्रकरणी निकाल देण्यात आला. त्यात अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाला. या निर्णयानंतर या आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका होणार आहे.
आजच या अपघातात ठार झालेल्या तरुण आणि तरुणीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा निकाल आला.