इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. आज त्यावर निर्णय देण्यात आला. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने २० जून रोजी दिलेला जामीन आदेश रद्द केला.
काल त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांनी धाव घेतली होती. पण, येथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. आता त्यांच्या जामिनाला पुन्हा नकार मिळाल्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.