नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील शिवशक्ती चौकात घरात बोलावून घेत एका ५० वर्षीय शेजा-याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलीसांनी अटक केली आहे.
रामदास बापूश्री पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित इसम तिचा शेजारी आहे. रविवारी संशयिताने पाण्याची बादली भरूण आणण्यास सांगितल्याने मुलगी पाणी घेऊन त्याच्या घरी गेली असता संशयिताने तिचा विनयभंग केला.
यावेळी त्याने आजोबासह आई वडिलांकडे याबाबत वाच्यता केल्यास तुला मारेल असा दम भरल्याने भेदरलेल्या मुलीने घरी जावून आपल्या कुटुंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत करीत आहेत.