इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न चांगलेच चर्चेत राहिले. लग्न ठरल्यापासून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. तर सोनाक्षीच्या कुटुंबियांची नाराजी या लग्नामुळे समोर आली. शत्रुघ्न सिन्हा व सोनाक्षीची आई पुनम लग्नाला उपस्थितीत होते. पण, दोन्ही भाऊ या लग्नात नव्हते. त्यामुळे लग्न झाले असले तरी त्यानंतर काही कमेंट येऊ नये व वादाची ठिणगी पडू नये साठी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
या दोघांनी लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच त्यांचा कमेंट सेक्शन बंद केला आहे. ट्रोलिंग टाळण्यासाठी हे मोठे पाऊल या दोघांनी घेतले आहे. वेगवेगळ्या धर्मात लग्न केल्यामुळे दोघांना ट्रोल केले जात आहे. त्यामुळे या दोघांनी कमेंट सेक्शनच बंद केले आहे.
खरं तर ब-याच वेळा सेलिब्रिटी कमेंटकडे फारसे लक्ष देत नाही. पण, या लग्नाला बराच विरोध झाला. त्यामुळे दोघांनी हा निर्णय घेतला. कमेंट बंद झाल्यामुळे अनेकांना लग्नाच्या शुभेच्छाही सोशल मीडियावर देता येत नसल्यामुळे नाराजी आहे.