इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने आयसीसी टी २० वर्ल्ड कपमधील सुपर ८ मधील सामन्यात ऑस्ट्रेलियावर धुव्वा उडवत पराभव केला. २४ धावांनी हा पराभव करत भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान होते. पण, ऑस्ट्रलियाच्या १८१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंग दिली. त्यानंतर भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने ९२, विराट कोहली शुन्यावर आऊट झाला. तर ऋषभ पंत १५, सूर्यकुमार यादव ३१ आणि शिवम दुबेने २८ धावा केल्या. हार्दिक पंड्या २७ आणि रवींद्र जडेजा ९ धावांवर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोयिनस या दोघांनी २-२ विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूडने १ विकेट घेतली.
त्यानंतर भारतीय संघाने गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. भारतीय संघाने अर्शदीपने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने १-१ विकेट घेतली.