नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या गंगापूर रोड येथील किंगस्टन क्लब येथे आयोजित महाराष्ट्र ब्रीज स्विस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूर सिक्स यअ संघाने विजेतेपद पटकावले. तर रुईया ब्लेझर्स संघाने उपविजेतेपद मिळविले. २० संघाचा समावेश असलेल्या यअ स्पर्धेत चांगलीच चुरस दिसून आली. पहिल्या दिवशी या वीस संघांमध्ये आठ राऊंडस खेळविले गेले. या आठ राऊंडस नंतर गुणानुक्रमे पहिल्या आठ संघांना मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळाला. या आठ संघांमध्ये खेळल्या गेलेल्या राऊंड रॉबिन बोर्डस मध्ये अनेक चंढ-उतार बघायला मिळाले. सुरवातीच्या तीन राऊंड मध्ये नागपूर सिक्स संघ सहाव्या क्रमांकावर तर रुईया ब्लेझर्स, समाधान संघ, अमोनारा “ब” हे संघ अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर होते. मात्र एसं. छाजेड, एस. रॉय, ए.जे.पुराणिक, व्ही. जे. पुराणिक आणि ए. मोहोता यांचा समावेश असलेल्या नागपूर सिक्स संघाने चवथ्या राऊंड नंतर एकमेकमध्ये चांगला समन्वय राखून जास्त गुण मिळविण्यात यश प्राप्त केले.
तर पहिल्या क्रमांकवर असलेल्याअरविंद वैद्य, विवेक बेंद्रे, ती. व्ही. रामाणी, सुभाष भावनांनी यांच्या रुईया ब्लेझर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर अॅक्वारियस संघाने ७८.९६ गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला. सिक्स शार्प शूटर्स संघ(७१.४०), हजरणीस संघ (६९.६९), समाधान (५९.६८) अमोनारा ”ब” (५७.६६), आणि अहमदाबाद संघ (४४.३२) या संघानी अनुक्रमे चार ते आठ क्रमांक मिळविले. या आठ संघांना प्रमुख आथिति मित्र विहार क्लबचे अध्यक्ष आणि जेष्ठ क्रीडा संघटक विनोद कपूर यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. याचबरोबर आय. एम. पी. पेअर्स या प्रकारात माधवी कानिटकर आणि रघुनाथ कानिटकर या जोडीने ३६. ३० गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. तर तरल रॉडरी रॉड्रिगेस आणि तीलकराज चौधरी या युवा जोडीने सुंदर खेळ करून ३४.०० गुणासह दूसरा क्रमांक मिळविला. नाशिकचे राहुल खंबेटे आणि हेमंत पांडे या जोडीने ३३.०० गुणघेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी डायरेक्टर म्हणून भालचंद्र दक्षिणदास तर तांत्रिक प्रमुख म्हणून विश्वनाथ बेडिया यांनी आपली जबाबदारी काम पार पाडली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव आणि या स्पर्धेचे आयोजन प्रमुख, स्पर्धा सचिव सूर्या रेड्डी, डॉ. अतुल दशपुत्रे, सागर यांनी परिश्रम घेतले.