इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आज आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हे उपोषण सुरु कतांना त्यांनी अन्नपाणी आणि औषधही न घेण्याचा निर्णय घेतला. पण, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांची आज उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी पाण्याचा त्याग न करण्याची विनंती केली. ती जरांगे पाटील यांनी छत्रपती घराण्याचा मान म्हणून मान्य केली. पण, ती एक दिवसच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संभाजी राजे म्हणाले की, काल दसरा होता म्हणून येता आले नाही. पण, आज मी आलो. जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यासाठी मी जात असतो. मनोज हा अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक आहे. म्हणून त्याच्यासाठी मी आल्याचेही त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी य़ाअगोदर उपोषण केल्यानंतर सरकारला निर्णय घेण्यासाठी ४० दिवसाची मुदत दिली होती. ती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना उपोषण करु नये यासाठी फोन केला. पण, त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असल्याचे सांगत त्यांना नकार दिला.