प्रांजली लाळे, मनमाड
मला भावलेली व्यक्तिरेखा…तिचं हसणं वेगळं…तिचं वागणं वेगळं…तिचं होती जगावेगळी…जाणं तिचं या जगातून अवेळी अजूनही मनाला लागली हुरहूर लागलेली अभिनेत्री स्मिता पाटील.
उंबरठा,जैत रे जैत,अर्थ,आक्रोशसारखे एक ना अनेक चित्रपट गाजवणारी ‘स्मिता’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी….. जिची उणीव अजूनही जाणवते.ती खरंच होतीच जगावेगळी… समाजजीवनाचे भान असलेली. तिची ‘जैत रे जैत’ मधली आदिवासी स्त्री असू दे नाही तर उंबरठा मधील रेक्टर.मन प्रभावित करुन गेली.समाजातील साचेबद्ध धाटणीपेक्षा वेगळे काही तरी होतं तिच्या प्रगल्भ अभिनयात.तिचा अभिनय म्हणजे ‘न भूतो न भविष्यती’
‘मी रात टाकली.. मी कात टाकली’,म्हणत जंगल तुडवत ऐटीत चालणारी स्मिता पाटील.ही ऐंशीच्या काळातील अशिक्षित पण निडर आदिवासी स्त्री.. ही आधुनिक व विकसित समाजजीवनाचे प्रतिकच नव्हे काय ? उंबरठा मधली आई जी समाजसेवेची ओढ असलेली..एक स्त्री म्हणून खरा न्याय देणारी.. पण आई म्हणून कमी पडणारी..घर की करिअर संभ्रमात करिअरची निवड करुन घर गमावून बसते.किती सुंदर अभिनय स्मिताचा…विशेष म्हणजे मी हा सिनेमा माझ्या चाळीशीत पाहिला.तिची तळमळ..तिची कुचंबणा प्रकर्षाने जाणवली.कुठंतरी चुकतय..पण काय. समाजजीवन खऱ्या अर्थाने समजतं ते तिला घराबाहेर पडल्यावर हे किती छान समजावलं स्मिता पाटील यांनी.वैयक्तिक जीवनात खुप काही आनंदी नसतानाही त्यांनी त्यांचे दुःख कधी अभिनयाच्या आड येऊ दिले नाही..मला वाटते त्या एक अनमोल, अष्टपैलू हिरा होत्या.
जन्मापासूनच समाजसेवेचे बाळकडू मिळालेल्या स्मितांना मिळाले होते हे नक्की. मला त्यांचा अभिनय खरोखर आवडला तो उंबरठा मधील.एक आई जी आपल्या लेकरापासूनच दुरावते..तिची घराबद्दल असणारी ओढ,नवऱ्यावरचे अतोनात प्रेम आणि करिअर यामध्ये कोणतीही तोडजोड न करु शकणारी स्त्री. ती भूमिका आजच्या समाजजीवनाचे प्रतिकच नव्हे काय ? कित्येकजणांना स्मिता माहिती नसतीलही कदाचित. पण त्यांच्या सारखी अभिनेत्री होणे नाही. त्यांचा प्रत्येक अभिनय समाजातील स्त्रीची वेदना,समस्या मांडणारा होता. एक निर्णयक्षम ,स्वतंत्र विचारांच्या व्यक्ती म्हणून माझ्या मनावर अधिराज्य गाजवणारी सावळी पण अतिशय सुरेख, तरतरीत नाक,मोठे डोळे असणारी ललना म्हणजे स्मिता पाटील.आजही स्मिता नाव वाचले,ऐकले की प्रथम जो चेहरा येतो तो स्मिता पाटील यांचाच. बिनधास्त, बिनदिक्कत आपल्या मताशी ठाम असणाऱ्या स्मिता पाटील प्रत्येक स्त्रीला काही तरी सांगून गेल्या ते म्हणजे तु एक शक्ती आहेस….
तुला स्वतःच एक तेजोवलय आहे. त्यातुन तुला आयुष्यातील मार्ग शोधायचा आहे. मुळातच हाडाच्या समाजसेविका असलेल्या स्मिता त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान करुन गेल्या. त्यांची आधुनिक विचारसरणी,आपले विचार परखडपणे मांडण्याचा स्वभाव मला फार आवडला.आपले विचार समोरच्यापर्यंत शांतपणे पोहचवता येतात हे स्मितांकडून शिकता येतील.त्यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर देखील त्यांचे १४ चित्रपट प्रदर्शित झाले. हे एक आश्चर्यच नव्हे काय? जगण्याची उमेद होती तिला…उद्याची आस होती तिला..एक स्री… तिच्या कोमल भावना.. अव्यक्त वेदना मनापासून साकारलेली अभिनेत्री अवघ्या ३१ व्या वर्षी जग सोडून गेली..हा दैवानी केलेला तिच्यावरचा अन्यायच होता.अखंड समाजाला प्रतिकार करण्यास भाग पाडणारी एक प्रखर ज्योत मृत्युपुढे थिटी पडली नव्हे नव्हे खऱ्या अर्थाने जिंकली… आम्हा चाहत्यांच्या मनावर ३४ वर्षांनंतरही अधिराज्य असणं कमालच आहे…नाही का?