इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेली अभिनेत्री कंगना राणावतने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागितल्याची माहिती समोर आली आहे. पण प्रोटोकॉलनुसार देता येत नसल्यामुळे प्रशासनाने कंगनाला स्पष्ट नकार दिला.
लोकसभा निवडणुकीत निवडून गेलेले सर्व खासदार अधिवेशनासाठी दिल्लीत गेले आहे. या ठिकाणी नवीन निवडून आलेल्या खासदारांना जोपर्यंत शासकीय निवासस्थान मिळत नाही. तोपर्यंत हे खासदार इतर ठिकाणी मुक्काम करणार आहेत. त्यामुळे कंगानाने सुध्दा पहिली पसंती महाराष्ट्र सदनला दिली. आज तीने महाराष्ट्र सदनमधील खोल्यांची पाहणी देखील केली. पण, येथे तीला महाराष्ट्र सदनमधील मुख्यमंत्र्यांची खोली आवडली. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी केली. त्यामुळे काही काळ प्रशासनही गोंधळले. पण, त्यांनी नंतर स्पष्ट नकार दिला.
या खोलीसाठी तिने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला महाराष्ट्र सदनमध्ये असताना कॉल केल्याचेही बोलले जात आहे. या ठिकाणी इतर रूम छोट्या असल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी तीने केल्याचे समजते.