इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – रॅडो या कालातीत डिझाइन्स निर्मितीकरिता नाविन्यपूर्ण साहित्याचा उपयोग करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित स्विस वॉचमेकर कंपनीला त्यांची ग्लोबल ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड सुपरस्टार कतरिना कैफ यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
रॅडोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड्रियन बोशार्ड म्हणाले, “आम्हाला रॅडो कुटुंबामध्ये कतरिना कैफ यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांची मोहक सुंदरता व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धी रॅडोच्या मुलभूत तत्त्वांशी संलग्न आहेत. आम्ही सहयोगाने लक्झरीला नव्या उंचीवर नेण्याच्या या प्रवासाप्रती उत्सुक आहोत.”
कतरिना कैफ या सहयोगाबाबत आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, मला वॉचमेकिंगमधील सर्वोत्तमतेसाठी ओळखला जाणारा ब्रॅण्ड रॅडोसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. रॅडो वॉचेसनी त्यांची नाविन्यपूर्ण डिझाइन्स व दर्जाप्रती कटिबद्धतेमुळे माझे लक्ष वेधून घेतले आहे. मी या प्रतिष्ठित स्विस ब्रॅण्डचे जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधीत्व करण्यास उत्सुक आहे.