इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ही बोट एका खडकावर आपटून तीचे तीन तुकडे झाले. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होते. त्याच वेळी हा अपघात झाला. बचाव पथक तातडीने मदतीसाठी पोहचल्यामुळे अनर्थ टळला.
वैनगंगा नदीच्या पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर हा जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प साकारला जात आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच या प्रकल्पाची उभारणी होत आहे. या प्रकल्पासाठी १०२ कोटींचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आहे.