इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव येथे आदित्य लॉन्स वर शिवसेना शिंदे गटाकडून झालेल्या पैसे वाटपाच्या कार्यक्रमासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. याची माहिती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यानी दिली आहे.
काल सुषमा अंधारे यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर पुन्हा जळगावमध्ये सभेनंतर पैसे वाटप करणारी व्यक्ती दराडेंच्या येवलेच्या शिक्षण संस्थेतील प्राचार्य उत्तम जाधव आहे. तर ज्यांना पैसे घेणारे जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी आहे. अजूनही पुरावे मी इथेच उघड करायचे की आयोगाकडे द्यायचे ते सांगा असे दुस-या पोस्टमध्ये म्हटले होते.
मुख्यमंत्री यांची सभा झाल्यानंतर ही घटना घडली होती. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवार आहे. त्यांनी ठाकरे गटातून या निवडणूकीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत नाशिक, जळगाव, नगर, नंदुबार, धुळे हे पाच जिल्ह्याचे शिक्षक मतदार असून त्यांची संख्या जवळपास ७० हजाराच्या आसपास आहे.