नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मीडियाला संबोधित करतांना म्हणाले की, ही निवडणूक खूप महत्त्वाची बनली. कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे.
देशात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आज संसदेचा पहिला दिवस आहे. संसद सुरु झाल्यानंतर भाजप खासदार भर्तृहरी महताब यांनी १८ व्या लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही शपथ दिली.