इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये महिला कॅान्स्टेबलबरोबर आपत्तीजनक स्थितीत हॅाटेलमध्ये सापडलेल्या डीएसपीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुळ पदावर म्हणजे थेट कॅान्स्टेबल करण्यात आले आहे. कृपा शंकर कनौजिया असे या अधिका-याचे नाव आहे.
कनौजिया हे देवरिया जिल्ह्यात राहणारे असून ते १९८६ साली उत्तर प्रदेश पोलिसमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. विभागीय परीक्षा दिल्यानंतर ते हेड कॅान्स्टेबल, नंतर सब इन्स्पेक्टर पदापर्यंत गेले. त्यानंतर पदोन्नतीने ते डीएसपी म्हणून उन्नाव जिल्ह्यातील बीघापूर येथे नियुक्त होते.
जुलै २०२१ मध्ये त्यांना कानपुर येथील एका हॅाटेलमध्ये महिला कॅान्स्टेबलबरोबर आपत्तीजनक स्थितीत पकडले गेले. त्यानंतर त्यांना गोरखपूर येथ बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली. त्यात ते दोषी आढळल्यानंतर पोलिसांच्या आचरण नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे डीएसपी वरुन त्यांना कॅान्स्टेबल या मुळ पदावर आणण्यात आले.