इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेले. त्यानंतर ते दिल्लीहून नागपूरला सकाळी आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे ते दिल्लीला एकटेच गेले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुध्दा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
या अचानक दौ-यामागील कारण स्पष्ट झाले नाही. त्याचप्रमाणे दिल्लीला ते कोणाला भेटलेही हेही पुढे आले नाही. त्यामुळे यातून अनेक तर्क काढले जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे कारण बोलले जात असले तरी त्यासाठी सर्व नेते एकत्र गेले असते. पण, मुख्यमंत्री अचानक गेल्यामुळे अनेक अंदाज बांधले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षीत यश न मिळाल्यामुळे मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. आता हे बदल कोणते असेल हे मात्र गुलदस्त्यात आहे. चार पक्ष येऊनही महाविकास आघाडीने जोरदार लढत दिली. त्यात अजूनही राज्यात काही प्रश्नांवर तितकाच असंतोष आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठ्या हालचाली व बदल अपेक्षीत आहे. त्यामुळे या दौ-याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री नागपूरला आल्यानंतर भंडारा येथे असलेल्या नियोजीत कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे.