इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळ: वायनाडच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता भाजपने सुध्दा या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत तेचे भाजपचे उमेदवार या लोकसभेत होते.
के. सुरेंद्रन म्हणाले की, आम्ही सर्व शक्तीनिशी लढू आणि प्रियंका गांधी (वड्रा) यांना कडवी लढत देऊ. या ठिकाणी खरी लढत एनडीए आणि यूपीएमध्ये आहे, या निवडणुकीत आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने लढू… जर प्रियंका गांधी गर्दी खेचणाऱ्या किंवा मोठे नाव असलेल्या असत्या तर त्यांनी उत्तर प्रदेशात निवडणूक का लढवली नाही?… प्रियंका गांधींचा रायबरेली किंवा अमेठीत विचार का करण्यात आला नाही? राहुल गांधींनी वायनाडमध्ये काय केलं? त्यामुळे लोक याचा पुनर्विचार करतील..असे प्रश्नही त्यांनी उपस्थिती केले.
याअगोदर राहुल गांधी यांच्याकडून पराभूत झालेल्या सीपीआय नेत्या ॲनी राजा यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी आणि काँग्रेसने निर्णय घेतला आहे की ते रायबरेली राखतील आणि वायनाड सोडतील… मी निवडणूक लढवणार की नाही? वायनाडमधून पुन्हा उमेदवार असेल का..हा माझ्या पक्षाचा निर्णय असेल… आतापर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे पक्षात आणि एलडीएफमध्ये उमेदवाराबद्दल चर्चा करण्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे. आम्हाला जास्तीत जास्त महिलांची गरज आहे. संसदेसाठी UDF ने महिला उमेदवाराची घोषणा केली याचा मला आनंद आहे.
असे झाले होते मतदान
ॲनी राजा यांनी राहुल गांधी विरोधात निवडणूक लढवली होती. यात राहुल गांधी यांना ६ लाख ४७ हजार ४४५ तर एनी राजा यांना २ लाख ८३ हजार २३ मते पडली होती. तर भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन यांना १ लाख ४१ हजार ४५ मते पडली होती. तर सहा उमेदवारांना दोन हजारापेक्षा कमी मते होती.